सोलापूर येथे ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथाचे मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत प्रकाशन !

लघुग्रंथाच्‍या प्रकाशन प्रसंगी उपस्‍थित मान्‍यवर

सोलापूर, २ मार्च (वार्ता.) – श्री दत्तगुरूंना प्रिय असलेल्‍या स्‍तुतीस्‍तोत्रांचा संग्रह म्‍हणजेच नित्‍योपासना ! दत्तगुरूंची कृपा प्राप्‍त करण्‍यासाठी दत्त संप्रदायात प्रचलित असलेल्‍या स्‍तुती आणि स्‍तोत्र यांचे संकलन दत्त गवई ज्ञानेश्‍वर माऊली वाघमारे यांनी केले आहे. दैनंदिन उपासनेत दत्तभक्‍तांना हे स्‍तोत्र एकत्रित उपलब्‍ध व्‍हावे, यासाठी ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथामध्‍ये सर्व स्‍तोत्रांचा समावेश केलेला आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार भवन येथे मान्‍यवर दत्तभक्‍तांच्‍या उपस्‍थितीत ‘नित्‍योपासना’ या लघुग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले.

या वेळी दत्तगवई ज्ञानेश्‍वर माऊली वाघमारे म्‍हणाले, ‘‘दत्त महाराज ही स्‍मर्तृगामी देवता आहे. अल्‍पशा सेवेने दत्त महाराज प्रसन्‍न होतात. कलियुगामध्‍ये श्रीपाद श्रीवल्लभ म्‍हणजे दत्त महाराजांचेच अधिष्‍ठान असल्‍याने दत्तगुरूंची केलेली सेवा त्‍वरित फळाला येते. दत्त महाराज हे गायन प्रिय, संगीत प्रिय आहेत. त्‍यामुळे गायनाच्‍या माध्‍यमातून केलेली कोणतीही सेवा त्‍यांच्‍यापर्यंत पोचते.’’

कार्यक्रमाला उपस्‍थित मान्‍यवर

स्‍वामीभक्‍त डॉ. प्रदीप कार्यकर्ते, संगीत विशारद सुरश्री कार्यकर्ते, गुरुवर्य प.पू. मीनाताई राघवेंद्राचार्य जोशी, सोलापूर जिल्‍हा पत्रकार संघाचे सरचिटणीस श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी, व्‍हिजन परिवाराचे श्री. राज दुर्लेकर, श्री. मंगेश धोरण, श्री. राहुल शिंदे, अधिवक्‍ता नितीन स्‍वामी, सौ. सुनीता पाटील