वारीशे यांच्या घातपाताविषयी सखोल चौकशी करण्याविषयी आमदार डॉ. राजन साळवी यांनी मांडली लक्षवेधी सूचना

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिके संदर्भात पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.

तारांगणाच्या प्रवेशद्वारावर नगरपरिषदेच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांचा आरोप

डिसेंबर मासात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाजावाजा करून तारांगणचे उद्घाटन करण्यात आले, आज तारांगणमध्ये रत्नागिरी नगरपरिषदेचे कर्मचारी काम करत आहेत; मात्र अद्यापही मुख्याधिकार्‍यांच्या निदर्शनास वरील गोष्ट का आली नाही ?

ओणी अणुस्कुरा रस्त्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद ! – सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण

‘रस्ता तातडीने होणे आवश्यक होते; परंतु निधीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. येणार्‍या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.’

रेडी (सिंधुदुर्ग) येथील यशवंतगडाजवळ शिवप्रेमींवर बेमुदत उपोषणाची वेळ !

यशवंतगडाच्‍या तटबंदीला लागून अवैधरित्‍या करण्‍यात आलेले उत्‍खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्‍या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील शिवप्रेमी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 

स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांचा गड-दुर्गांच्‍या रक्षणासाठी कार्य करणार्‍यांवर असलेला विश्‍वास !

महामोर्च्‍याच्‍या आयोजनाच्‍या संदर्भात आयोजित केलेल्‍या बैठकीत स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर हे उपस्‍थित होते.

खासदार संजय राऊत यांच्‍यावर हक्‍कभंगाच्‍या कारवाईसाठी विधानसभा अध्‍यक्षांकडून १५ सदस्‍यीय समितीची निवड केली जाणार !

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला ‘विधीमंडळ नाही, तर चोर मंडळ’ म्‍हटल्‍याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले होते.

पुरातत्व विभागाची हिंदु विधीज्ञ परिषदेला माहिती राज्य पुरातत्व विभागातील ३०० पैकी १३२ पदे रिक्त !

पुरातत्व विभागातील रिक्त पदे भरण्याविषयी ६ एप्रिल २०२२ या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांना पत्र पाठवले होते.

विशेष समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होणार !

मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी-सर्वोच्च न्यायालय.

त्रिपुरा आणि नागालँड येथे भाजपने सत्ता राखली !

मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहेत-खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले .