राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने रायगड येथील अनधिकृत दर्गा त्‍वरित हटवा  !

काही दिवसांपूर्वी येथून मोठ्या दुर्बिणीने टेहाळणी करणार्‍या संशयितांना ग्रामस्‍थांनी पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले होते. त्‍यामुळे भविष्‍यात या ठिकाणाहून कोणते राष्‍ट्र आणि समाज विघातक कृत्‍य घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने या दर्ग्‍यासह येथील सर्व अनधिकृत बांधकाम त्‍वरित हटवावे, अशी मागणी करण्यात येत आहे

राज्‍यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीने वाढ !

महाराष्‍ट्रात २७ मार्च या दिवशी कोरोनाबाधित नवीन २०५ रुग्‍ण आढळले; मात्र २८ मार्च या दिवशी ४५० नवीन रुग्‍ण आढळले. म्‍हणजे एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पोलीस खात्‍याकडे साडेपाच कोटींचे भाडे थकीत !

कोट्यवधींची थकबाकी का राहिली ? याचा अभ्‍यास होणे आवश्‍यक आहे. पुढे अशी थकबाकी राहू नये, यासाठी काय उपाययोजना काढणार ? हेही ठरवायला हवे !

तुळजापूर विकास आराखड्याचे जिल्‍हाधिकार्‍यांना सादरीकरण !

अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपये व्‍यय येणारा विकास आराखडा २७ मार्च या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करण्‍यात आला.

ठाणे पोलिसांनी बजावली ७ जणांना नोटीस

मुंब्रा येथील वन विभागाच्‍या जागेतील अनधिकृत दर्ग्‍यांवर कारवाई केली नाही, तर त्‍याशेजारी हनुमान मंदिर बांधण्‍याची चेतावणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली होती. त्‍यानंतर जाधव यांना धमकी दिल्‍याचा संदेश सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला होता.

वणी (यवतमाळ) येथील यात्रेत भर दिवसा शेतकर्‍याला मारहाण करून लुटले !

येथे होळीपासून बैलांची खरेदी-विक्री करण्‍यासाठी बैलबाजार भरतो. खेड्यातील शेतकरी बैल खरेदीसाठी येतात.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे पुणे येथे दीर्घ आजाराने निधन

भाजपचे खासदार गिरीश बापट (वय ७२ वर्षे) यांचे २९ मार्च या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. त्‍यांच्‍यावर दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालयात उपचार चालू होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे बनावट टि्‌वटर खाते बनवून भामट्याने पैसे उकळले !

महाराष्‍ट्रातील ‘लेडी सिंघम’ म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्‍या नावाने टि्‌वटरवर बनावट खाते उघडल्‍याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट खात्‍यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे ‘लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लांट’ केले असून उपचारासाठी पैशांची नितांत आवश्‍यकता असल्‍याची ‘पोस्‍ट’ टाकली.

आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या माजी अंगरक्षकाची आत्‍महत्‍या

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांचे माजी अंगरक्षक आणि अनंत करमुसे यांना मारहाण केल्‍याप्रकरणी जामिनावर सुटलेले पोलीस हवालदार वैभव कदम यांनी आत्‍महत्‍या केली आहे.

आम्‍ही अशा निर्जनस्‍थळी असलेल्‍या शाळांवर पोचायचे कसे ? – पन्‍नाशी ओलांडलेल्‍या पावणेतीनशे शिक्षकांचा प्रश्‍न

शिक्षकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्‍वतःहून यावर तोडगा काढला पाहिजे !