अभिनेते रामचरण आणि त्‍यांची पत्नी उपासना बाहेर जातांना समवेत नेतात छोटे मंदिर !

दक्षिणेतील चित्रपटसृष्‍टीतील सुप्रसिद्ध अभिनेते रामचरण आणि त्‍यांची पत्नी उपासना बाहेर जातांना समवेत छोटे मंदिर ठेवतात. ‘यातून आम्‍हाला ऊर्जा मिळत असून भारताशी जोडून रहाण्‍याची प्रेरणा मिळते’, असे या दोघांनी म्‍हटले आहे.

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेची राष्‍ट्रीय हरित न्‍यायाधीकरणात याचिका !

कृष्‍णा नदीमध्‍ये दूषित पाण्‍यामुळे सहस्रो मासे मृत्‍यूमुखी पडल्‍याने ‘स्‍वाभिमानी शेतकरी संघटने’चे अध्‍यक्ष, तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील ‘राष्‍ट्रीय हरित न्‍यायालयात’ याचिका प्रविष्‍ट केली आहे.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेबसिरीजवर बंदी घाला !

३ मार्चपासून ‘झी-५ (ZEE 5)’ या ओटीटी प्‍लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेबसिरीजद्वारे हिंदूंवर अत्‍याचार करणार्‍या क्रूर अकबर आणि त्‍याच्‍या परिवाराचे म्‍हणजेच मोगलांचे उदात्तीकरण केले जात आहे.

सोलापूर विद्यापिठाचे अंदाजपत्रक सादर होत असतांना अभाविपकडून घोषणाबाजी !

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचे वार्षिक अंदाजपत्रक १५ मार्चला दुपारी सादर करण्‍यात आले. विद्यापिठाच्‍या मुख्‍य सभागृहात अंदाजपत्रक सादर होत असतांना सभागृहाच्‍या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या विद्यार्थ्‍यांकडून विद्यापीठ प्रशासनाच्‍या विरोधात घोषणाबाजी करण्‍यात आली..

डोंबिवलीतील नववर्ष स्‍वागतयात्रेसाठी ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्‍पना कार्यान्‍वित !

नववर्ष स्‍वागत यात्रेनिमित्त यावर्षी ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्‍पना घेऊन स्‍वागत यात्रेचे नियोजन करण्‍यात आले आहे. हिंदु धर्म-संस्‍कृतीच्‍या व्‍यापक रूपाचे प्रतिबिंब चित्ररथ, दिंड्या, देखावे या माध्‍यमांतून प्रदर्शित केले जाणार आहे.

‘मार्वलस इंजिनिअर्स प्रा. लि.’ यांच्‍या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्‍णालयास ‘ई-रुग्‍णवाहिका’ प्रदान !

या प्रसंगी ‘इनरव्‍हिल क्‍लब’च्‍या अध्‍यक्षा महानंदा चंदरगी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, ‘मार्वलस इंजिनिअर्स प्रा. लि.’चे संग्राम पाटील, गौरव पाटील, डॉ. लोकरे, विद्या पठाडे, पल्लवी मूग, तसेच अन्‍य उपस्‍थित होते.

क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण रोखण्‍यासाठी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे पोलिसांना निवेदन !

सामाजिक प्रसारमाध्‍यमांवरून क्रूरकर्मा औरंगजेब याचे उदात्तीकरण रोखण्‍यासाठी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुुस्‍थानच्‍या पुसेसावळी विभागाच्‍या वतीने आैंध पोलीस ठाण्‍यात उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देण्‍यात आले.

रिक्‍शांचे ई-रिक्‍शात रूपांतर करण्‍यासाठी पुणे महापालिका देणार २५ सहस्र रुपये अनुदान !

देशासह राज्‍यात इंधनाच्‍या किंमतीत सातत्‍याने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात इलेक्‍ट्रिक वाहनांच्‍या वापराला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी अनुदान योजना राबवण्‍यात येत आहे.

कसबा (संगमेश्वर) येथील श्री कर्णेश्वर मंदिरात नयनरम्य किरणोत्सव !

तालुक्यातील कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभार्‍यातील शिवपिंडीवर १४ मार्च या दिवशी सकाळी ७ वाजता सूर्यकिरण आल्यामुळे भक्तगणांना किरणोत्सवाचा आनंद लुटता आला. गाभार्‍यात सर्वत्र पसरलेला सूर्यदेवाच्या सोनेरी प्रकाशाचा नयनरम्य सोहळा पहाण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती.

कोकण विकासाचा नवा मार्ग : काजू मंडळाची स्थापना !

रत्नागिरी जिल्ह्याची ओळख हापूस आंब्यामुळे जगाला आहे, तसेच येथील फळबाग उत्पन्नात काजूच्या पिकालाही अधिक महत्त्व दिले आहे. याचसाठी या वर्षी अर्थसंकल्पात काजू उत्पादनासमवेत काजू बोंड प्रक्रिया उद्योग आणि संशोधन याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.