श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५० जणांकडून रक्तदान !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदान मास यांच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १० मार्चला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

धर्मवीर संभाजी महाराज समस्त हिंदुजनांचे दैवत ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व सुखांचा त्याग करून निरंतर ९ वर्षे स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराज हे शूर, पराक्रमी तर होतेच, तसेच रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे आदर्श अधिपती होते.

(म्हणे) ‘आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती घटनाबाह्य !’ – आमदार रईस शेख

आमदार रईस शेख यांचा उच्च न्यायालयातील याचिकेत दावा !

धर्माचरण करून घराला सावरणारी स्त्रीच असते ! – सौ. गौरी जोशी, हिंदु जनजागृती समिती

घराला सावरणारी स्त्री असते, तर घराला उद्ध्वस्त करणारीही स्त्रीच असते. हल्ली आधुनिकतेच्या नावाखाली बहुतांश स्त्रियांनी धर्माचरण करणे सोडले आहे. ही परिस्थिती पालटायला हवी, अन्यथा कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल.

सोलापूर येथे विश्वशांतीसाठी ‘श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन’ उत्सव !

श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टच्या वतीने श्रो.ब्र.श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या संकल्पनेतून १७ ते १९ मार्च या कालावधीत विश्वशांतीसाठी ‘श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन’ उत्सव आणि मठाचा लोगो अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंदिरांमधून निधीचा विनियोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी झाला पाहिजे ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर, राष्ट्रीय वारकरी परिषद, कार्याध्यक्ष

ज्याप्रमाणे मदरशातून इस्लामचे शिक्षण दिले जाते, चर्चमधून ख्रिस्त्यांना शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मंदिरांमधून मिळणार्‍या पैशांचा उपयोग सरकारी कामांसाठी न होता हिंदूंना त्यांच्या मुला-मुलींना हिंदु धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी झाला पाहिजे.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत : गुंतवणूकदार चिंतेत

वर्ष २००८ मधील आर्थिक मंदीनंतर सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेतील बुडालेली सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. सिलिकॉन बँकेची स्थापना वर्ष १९८३ मध्ये बिल बिगरस्टफ आणि रॉबर्ट मेडेरिस यांनी कॅलिफॉर्निया येथे केली.

वडील माझे लैंगिक शोषण करायचे ! – स्वाती मालीवाल, अध्यक्षा, देहली महिला आयोग

यावरून समाजाची नीतीमत्ता किती रसातळाला गेली आहे, हेच स्पष्ट होते ! नीतीमान समाज घडवण्यासाठी प्रत्येकाला साधना शिकवणेच अनिवार्य आहे, हे सरकारने आता तरी लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करावी !

तेलंगाणातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्या के. कविता यांची चौकशी !

देहली येथील अबकारी धोरण, म्हणजेच मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

उद्योजक सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ‘ईडी’ची कोठडी !

‘ईडी’ने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून १ कोटी रुपये विभास साठे यांना दिले गेल्याचे उघड झाले आहे. सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.