जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांचा मोर्चा !

राज्य सरकारने जुनी सेवानिवृत्त योजना बंद केली आहे. यामुळे सरकारी कर्मचारी अनेक लाभांपासून वंचित रहात असल्याने सरकारने परत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी १२ मार्च या दिवशी सांगली येथे पुष्पराज चौक ते स्टेशन चौक असा भव्य मोर्चा काढला.

आज खरशिंग (जिल्हा सांगली) येथील श्रीराम मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ !

वठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या श्रीराममंदिर, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याला प्रधान संकल्प मातृकापूजन उदक शांतीने प्रारंभ झाला.

इस्रायल सरकारच्या विरोधात ५ लाखांहून अधिक लोकांचे रस्त्यावर उतरून आंदोलन !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सरकारच्या विरोधात ५ लाख लोकांनी येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आतापर्यंतचे हे सर्वांत मोठा आंदोलन आहे.

आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या कुत्र्यांविषयीच्या विधानावरून आसामच्या विधानसभेत गदारोळ !

बच्चू कडू म्हणाले की, मला आसाम नव्हे, तर नागालँडचे नाव घ्यायचे होते. माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी क्षमा मागतो.

देहलीतील न्यायालयाच्या आवारात बार असोसिएशनच्या होळीच्या कार्यक्रमात अश्‍लील नाच !

व्यक्ती सुशिक्षित झाली, तिने एखादी पदवीही मिळवली; म्हणजे ती सुसंस्कृत आणि नीतीमान झाली, असे म्हणता येत नाही, हेच या घटनेवरून लक्षात येते !  संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जनतेने केली, तर त्यात चूक ते काय ?

कर्णावती येथील भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या वेळी घातपात करण्याची खलिस्तान्यांची धमकी !

खलिस्तान्यांची वाढती वळवळ कधी चिरडली जाणार ?

म्हशीला काठीने मारल्यावरून संभल (उत्तरप्रदेश) येथे हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार !

एका म्हशीला काठीने मारल्यावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. यात ६ जण घायाळ झाले. मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली.

बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर तिसर्‍यांदा दगडफेक

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे !

(म्हणे) ‘आम्ही गायीचे दूध पितो, तर भारतीय मूत्र !’-पाकिस्तानी

‘आम्ही गायीचे दूध पितो, तर ते गोमूत्र पितात. तुम्ही त्यांच्याशी आमची तुलना करणार का ? ते दगडाला देव मानतात, तर आम्ही अल्लाला मानतो’, अशी विधाने एक पाकिस्तानी नागरिक करत असल्याचे दिसत आहे.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राप्रमाणे मुसलमानही इस्लामी राष्ट्राची मागणी करू लागले तर . . ?’ – मौलाना तौकीर रझा

जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणी करणार्‍यांचीही मागणी योग्य आहे. त्यांची बाजू घेतली, तर आमचे मुसलमान तरुण उभे रहातील आणि त्यांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ?