|
मऊ (उत्तरप्रदेश) – येथील बडागावाजवळ १५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दुचाकीच्या धडकेवरून मुसलमानांनी एका हिंदूवर धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर येथे हिंसाचार झाला. पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१. या आक्रमणात सुखू राजभर हा गंभीररित्या घायाळ झाल्याने त्याला वाराणसी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुखू याने सांगितले की, २ दुचाकींवर ४ जण आले आणि त्यांनी मला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यांच्यापैकी एकाने स्कूटरची चावी काढली आणि त्याला जोडलेल्या चाकूने मला ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा घटनास्थळी जमाव जमला आणि त्यांना समजावून सांगू लागला. तेव्हा ते सर्व जण आजूबाजूला गेले. मी माझ्या भाचीला गाडीत बसवण्यासाठी मागे गेलो, तेवढ्यात ते मागून आले आणि त्यांनी चाकूने माझ्यावर अनेक वेळा वार केले.
२. हिंदु तरुणावर झालेल्या आक्रमणाची माहिती मिळताच संतप्त हिंदूंनी रस्त्यावर येत धर्मांध मुसलमानांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत रुग्णालय आणि पोलीस ठाणे यांना घेराव घातला. या वेळी दगडफेकही झाली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला.
३. या प्रकरणी स्थानिक खासदार राजीव राय यांनी जिल्ह्यातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.