नवी देहलीत झालेल्या इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटामागे इराणचा हात !

स्थानिक भारतियांचा स्फोटासाठी वापर !

  • कालपर्यंत पाकसाठी देशद्रोही कारवाया करणारे आता इराणसाठीही देशद्रोही कारवाया करत आहेत, हेच यातून लक्षात येते !
  • पाकसमवेत आता इराणही भारतात सहजरित्या आतंकवादी कारवाया करू शकतो, हे भारताच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा यांना लज्जास्पद ! अशी सुरक्षायंत्रणा भारतियांचे संरक्षण करू शकेल काय ?

नवी देहली – जानेवारी मासाच्या शेवटी येथील इस्रायलच्या दुतावासाजवळ झालेला बॉम्बस्फोट इराणने केल्याचे उघड झाले आहे. यासाठी स्थानिक लोकांचे साहाय्य घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या स्फोटाचे अन्वेषण करणार्‍या एन्.आय.ए. आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद यांच्या अन्वेषणातून ही माहिती पुढे आली आहे.