वर्गात रागवल्याने त्याचा सूड घेण्यासाठी विद्यार्थ्याचा शिक्षकावर गोळीबार

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन निघत असलेले धिंडवडे !

लहानपणीच साधनेचे संस्कार न केल्याचाच हा परिणाम आहे. याला आतापर्यंतचे शासनकर्तेच उत्तरदायी आहेत. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलांना लहानपणापासून साधना शिकवण्याची व्यवस्था करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

(प्रतिकात्मक चित्र)

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील सरस्वती विहारमधील कृष्णा विद्या शाळेत सचिन त्यागी या वाणिज्य विषय शिकवणार्‍या शिक्षकावर त्यांच्या वर्गातील एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच गोळ्या झाडल्या.

(सौजन्य : NEWS IN INDIA UP)

सुदैवाने त्यांच्या खाद्याला गोळी लागून गेल्याने ते बचावले. सचिन त्यागी यांनी वर्गात सर्वांसमोर रागवल्यामुळे अपमान झाल्याने या विद्यार्थ्याने त्याच्या ३ साथीदारांसह हा गोळीबार केला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.