८ मार्चच्या जागतिक महिलादिनी दोन महिलांनी ५१० कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले खेड्यामधील दारूचे दुकान !

  • यातून खेड्यातील या दुकानातून कोट्यवधी रुपयांची दारूची विक्री होत असणार, हे स्पष्ट होते ! समाजाला विनाशाच्या खाईत लोटणार्‍या दारूचे दुकान कोट्यवधी रुपयांमध्ये विकले जाणे, हे समाजाचे घोर अधःपतन दर्शवते !
  • महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात वावरत आहेत. समाजाला विनाशाच्या वाटेवर नेणार्‍या दारूचे दुकान खरेदी करून समाजाला मद्यपी बनवण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेतला आहे, असे समजायचे का ?

हनुमानगढ (राजस्थान) – राजस्थान सरकार राज्यातील दारूच्या दुकानांची जाहीर लिलावाद्वारे बोली लावून त्यांची विक्री करत असते. (असे करून जनतेला मद्यपी बनवण्याचा घाट घालणारे काँग्रेस सरकार ! – संपादक) येथील एका खेड्यामधील दुकानासाठी करण्यात आलेला लिलाव तब्बल १५ घंटे चालला आणि एकाच कुटुंबातील दोघा महिलांनी ५१० कोटी रुपयांना हे दुकान विकत घेतले. यांपैकी एका महिलेचे नाव किरण कनवार आहे. ७२ लाख रुपयांपासून या दुकानाचा लिलाव चालू झाला होता. कनवार कुटुंबियांना या दुकानाच्या किमतीच्या २ टक्के रक्कम तातडीने उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे.

राजस्थानमध्ये दारूच्या दुकानांचा लिलाव ही समान्य गोष्ट आहे. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून ७ सहस्र ६६५ ठिकाणी लिलाव चालू आहे.

(सौजन्य : वनइंडिया हिन्दी)

यापूर्वीच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ही लिलावाची पद्धत बंद केली होती; मात्र काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही पद्धत पुन्हा चालू केली.