शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमा !

शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमण्याचे आवाहन गोवा राज्य महिला आयोगाने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांना केली आहे.

गोव्यात पुढील २ दिवसांत तापमानात वाढ होणार

गोव्यात पुढील २ दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान १ ते २ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे.

मोर्ले येथे हत्तीच्या आक्रमणात युवक गंभीर घायाळ

मोर्ले येथील शेतकरी विश्‍वनाथ सुतार काजूच्या बागेत गेले होते. तेव्हा अचानक आलेल्या हत्तीने सुतार यांच्यावर आक्रमण करत त्यांना उचलून आपटले. यामध्ये सुतार गंभीर घायाळ झाले.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण

सावंतवाडी – तालुका पत्रकार संघाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या दोन्ही ठिकाणच्या जनसुनावणीच्या वेळी गदारोळ

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची रवींद्र भवन, मडगाव आणि कला अकादमी, पणजी अशी दोन्ही ठिकाणी ७ मार्चला जनसुनावणी झाली. या दोन्ही ठिकाणी जनसुनावणीच्या वेळी नागरिकांनी गदारोळ घातला

हणजूण येथे नायजेरियन नागरिकाचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू

हणजूण येथे नायजेरियन नागरिक मायकल झुबे (वय ३३ वर्षे) याचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील २ खासगी दावे न्यायालयाने फेटाळले

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी लष्कर न्यायालयात नोंद करण्यात आलेले दोन्ही खासगी दावे न्यायालयाने फेटाळले आहेत.

कर्नाळा बँक आर्थिक घोटाळा प्रकरणाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष का ? -आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधीमंडळात प्रश्‍न

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५१२ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्‍न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात उपस्थित केला.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची घरपट्टी बुडवली ! – धनंजय महाडिक यांचा आरोप

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मिळकतींची वर्ष १९९७ पासून घरपट्टी थकित असून आजपर्यंत दंडाच्या व्यतिरिक्त ९१ लाख ६३ सहस्र २५२ रुपये इतकी रक्कम बुडवली आहे, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ६ मार्च या दिवशी पत्रकार बैठकीत केला.

नगर अर्बन अधिकोषातील बोगस कर्ज प्रकरणी माजी संचालकांना अटक

नगर अर्बन अधिकोषाच्या पिंपरी-चिंचवड शाखेत २२ कोटी रुपयांच्या बोगस कर्जप्रकरणात पोलिसांनी तत्कालीन संचालक नवनीत सुरापुरिया यांच्यासह दोघांना कह्यात घेतले आहे.