(म्हणे) ‘भारत आणि चीन मित्र असल्याने एकमेकांसाठी धोकादायक नाहीत !’ – चीनचे परराष्टमंत्री वांग यी

वांग यी यांनी म्हटलेले हे वाक्य अर्धसत्य आहे ! भारत चीनसाठी धोकादायक नाही; मात्र चीन भारतासाठी धोकादायक आहे. चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही. ‘हिंदी-चिनी भाईभाई’ म्हणत विश्‍वासघात करणार्‍या चीनच्या कुठल्याच शब्दावर आणि कृतीवर भारताला आता विश्‍वास ठेवता येत नाही !

वांग यी

बीजिंग (चीन) – भारत आणि चीन एकमेकांसाठी धोकादायक नाहीत, तर ते एकमेकांचे मित्र आहेत. दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. यामुळे आम्हाला हानी पोचवणारे काम थांबवले पाहिजे. सीमावाद आम्हाला वंशपरंपरेने मिळाला आहे. दोन्ही देश वाद योग्य प्रकार सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे महत्त्वाचे आहे. तसेच एकमेकांशी असलेल्या संबंधांच्या विकासासाठीही काम करत आहोत, असे प्रतिपादन चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी केले आहे. पँगाँग तलावाजळून सैन्य मागे घेण्याच्या घटनेवर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

वांग यी पुढे म्हणाले की, चीन आणि भारत मित्र अन् सहकारी आहेत; मात्र काही सूत्रांवर संशयाची स्थिती आहे. या स्थितीच्या पलीकडे जाऊन पहायला हवे आणि दोघांचे संबंध कशा प्रकारे पुढे नेऊ शकतो अन् सशक्त करू शकतो, हे पहायला हवे.