मुलीची छेड काढणार्‍या तरुणाचा तिच्या नातेवाइकांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू

मुली, तरुणी आणि महिला यांच्यावर होणार्‍या लैंगिक अत्याचारांविषयी जनतेमध्ये आणि पीडितांच्या कुटुंबियांमध्ये किती संताप आहे, हेच या घटनेतून समोर आले आहे. कायदा हातात घेऊन तरुणाला ठार मारणे चुकीचेच असले, तरी सरकार, पोलीस आणि प्रशासन अशा घटना रोखण्यासाठी निष्क्रीय असल्याने जनतेला कायदा हातात घ्यावा लागत आहे. याचा आता विचार करण्याची आवश्यकता आहे !

छतरपूर (मध्यप्रदेश) – येथील खांदिया गावात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने तिच्या आईने आणि काकाने आरोपीला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हेतराम कुशवाहा असे आरोपीचे नाव आहे. त्याने घरात घुसून या मुलीची छेड काढली होती. या प्रकरणी मुलीची आई आणि काका या दोघांना अटक करण्यात आली आहे.