शीख तरुणाशी विवाह करणार्‍या मुसलमान तरुणीला सासरच्या घरातून पळवून नेण्याचा तिच्या कुटुंबियांचा प्रयत्न

पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा नोंद करत अटक

हिंदु युवतीने मुसलमानाशी विवाह केल्यावर त्याला विरोध झाल्यास हिंदूंना उपदेशाचे डोस पाजणारे धर्मांधांच्या या वृत्तीविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

फतेहगड साहिब (पंजाब) – येथील मंडी गोबिंदगडमध्ये एका शीख तरुणाशी विवाह केलेल्या जम्मू-काश्मीरमधील मुसलमान तरुणीला तिच्या नातेवाइकांनी या तरुणाच्या घरातून उचलून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

शीख तरुण हरमन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरात काही दिवसांसाठी जम्मू-काश्मीरमधील एक कुटुंब रहायला आले होते. त्यातील असिमा बानो हिच्यावर त्यांचे प्रेम जडले. त्यांनी १२ फेब्रुवारीला गुरुद्वारामध्ये जाऊन तिच्याशी विवाह केला. त्या वेळी तिच्या कुटुंबियांनी कोणताही विरोध केला नाही. त्यानंतर ती त्यांच्या घरात राहू लागली. काही दिवसांनी तिचे कुटुंबीय परत काश्मीरला निघून गेले. २८ फेब्रुवारीला हरमन सिंह चंडीगड येथे गेले असता त्यांना दूरभाष करून कळवण्यात आले की, या तरुणीचे कुटुंबीय घरी आले असून ते एका गाडीमध्ये बसवून तिला घेऊन जात आहेत. हे कळताच हरमन सिंह यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर त्यांनी गाडीचा पाठलाग करून कुटुंबियांना अडवले आणि अपहरणाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.