अलवर (राजस्थान) येथे पोलीस ठाण्याच्या परिसरात महिलेवर बलात्कार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला अटक आणि बडतर्फीची कारवाई

अलवर (राजस्थान) – पतीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह याने त्याच्या रहात्या खोलीमध्ये त्याच्या एका साथीदारासह ३ दिवस बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला. त्यानंतर त्याला अटक करून त्याला पोलीस खात्यातून बडतर्फकही करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त अन्य ४ पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे.


पोलीस ठाण्याच्या परिसरातया उपनिरीक्षकाची खोली आहे. तेथे त्याने या महिलेवर बलात्कार केला होता.

वर्ष २०१८ मध्ये या महिलेने तिच्या पतीच्या विरोधात हुंडा मागण्यावरून आणि त्रास देण्यावरून गुन्हा नोंदवला होता. यावर नंतर तोडगा निघाला होता; मात्र आता तिच्या नवर्‍याला घटस्फोट घ्यायचा होता आणि ते तिला मान्य नव्हते. याची तक्रार करण्यासाठी ती पोलीस ठाण्यात आली होती.