छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंगाच्या स्फोटात २ जण घायाळ

नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक जीप उडवून लावल्याने २ नागरिक घायाळ झाले. बासागुडा आणि तर्रेम गावाच्या मध्य राजपेंटा गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी हा भूसुरूंग पेरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

होमिओपॅथी महिला डॉक्टरला पतीकडून इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी

केंद्र सरकारने अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक !

माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिकमधील एक सैनिक हुतात्मा, तर १० जण घायाळ

माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिक जिल्ह्यातील कमांडेंट नितीन भालेराव हा सैनिक हुतात्मा झाला. या आक्रमणात १० सैनिक घायाळ झाले. माओवाद्यांनी कोबरा बटालियनच्या सैनिकांच्या वाहन ताफ्यावर स्फोट घडवला.

भाजप नेत्यांचे विवाह ‘लव्ह जिहाद’मध्ये मोडत नाहीत का ?

मी भाजपच्या नेत्यांना विचारू इच्छितो की, ज्या भाजप नेत्यांच्या परिवारातील लोकांनी अन्य धर्मांमध्ये विवाह केले आहेत, ते ‘लव्ह जिहाद’च्या परिघात येत नाहीत का ? असा प्रश्‍न छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपला विचारला आहे.

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी २ सहस्र लोकांना मेजवानी देणार्‍या इरफान सिद्दकी या काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद

येथील अंबिकापूरमध्ये २२ मार्च या दिवशीच्या ‘जनता कर्फ्यू’च्या वेळी २ सहस्र लोकांना पंचतारांकित ‘ग्रँड बसंत’ या हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नेते इरफान सिद्दकी आणि हॉटेलचे संचालक के.के. अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.