वाळपई येथे गोमांस विकणार्‍या २ मुसलमानांना अटक

वाळपई, २७ एप्रिल (वार्ता.) – गोवंशियांची अनधिकृतरित्या क्रूर हत्या करून त्यांचे मांस विकणारे वाळपई येथील मुदस्सर शेख आणि रियाझ खान यांना वाळपई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ७५० किलो (अंदाजे किंमत ३ लाख रुपये) गोमांस कह्यात घेण्यात आले आहे. यासाठी ते दोघे वापरत असलेला चाकू, यंत्र आणि वजनकाटा हे साहित्यही कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी वाळपई पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • किती दिवसांपासून अशी उघडपणे ही गोमांसविक्री चालू होती ?
  • आतापर्यंत कुणाच्याच हे लक्षात आले नाही का ?
  • राष्ट्रप्रेमी नागरिकांनो, तुमच्या आजूबाजूला घडणार्‍या अनधिकृत आणि संशयास्पद गोष्टींकडे दुर्लक्ष न करता पोलिसांना कळवा ?