
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा चालू आहेत. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी वसतीगृहातील ढेकणांनी बेजार केले आहे. ढेकणांच्या त्रासाला कंटाळून अनेक विद्यार्थी वसतीगृहाच्या बाहेर म्हणजे मोकळ्या पटांगणांमध्ये अंथरुण टाकून झोपत आहेत. (प्रशासन याकडे लक्ष देणार कि नाही ? – संपादक)
वसतीगृहाची नियमितपणे स्वच्छता, देखभाल केली जात नाही. त्यामुळे ढेकणांचे प्रमाण वाढत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ढेकूण चावल्याची चित्रफीत सिद्ध करून वसतीगृहाच्या प्रमुखांना पाठवली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.