भारतभरात विविध मान्यवरांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

गोवा – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मदिवस आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव यांनिमित्त गोव्यात १७ ते १९ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे निमंत्रण देशभरातील विविध मान्यवरांना देण्यात आले आहे.

अ. महोत्सवाच्या स्वागत समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देहली येथे संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले. त्यांनी महोत्सवाला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. या वेळी श्री. कार्तिक साळुंके आणि श्री. श्रीराम लुकतुके उपस्थित होते.

संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांना निमंत्रण देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (डावीकडे)

आ. देहली येथे ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांना श्री. नरेंद्र सुर्वे आणि श्री. कार्तिक साळुंके यांनी निमंत्रण दिले. त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.

डावीकडे डॉ. सुरेश चव्हाणके यांना निमंत्रण देतांना श्री. नरेंद्र सुर्वे (मध्यभागी) आणि त्यांच्या बाजूला श्री. कार्तिक साळुंके

या मान्यवरांसह भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण देण्यात येत आहे.

अयोध्या येथील श्री गणेश्वरशास्त्री द्रविडगुरुजी यांना शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !

शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण घेतांना श्री गणेश्वरशास्त्री द्रविडगुरुजी

सांगली – अयोध्या येथील रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढणारे श्री गणेश्वरशास्त्री द्रविडगुरुजी यांच्या हस्ते तासगाव (जिल्हा सांगली) येथे श्री दुर्गादेवी मंदिराचा कलशारोहण समारंभ पार पडला. त्या वेळी त्यांना सनातन संस्थेच्या साधकांनी १७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले. या वेळी त्यांनी ‘१८ मे या दिवशी शंखनाद महोत्सवाला येणार आहे’, असे साधकांना सांगितले.