घोडेगाव (तालुका नेवासा) येथे ४० गोवंशियांची सुटका !

प्रतिकात्मक छायाचित्र

नेवासा (अहिल्यानगर) – तालुक्यातील घोडेगाव येथील संकेत साळवे आणि रवी आल्हाट यांच्या घरासमोर ४० गोवंशियांची कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे आढल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून ५ जणांना कह्यात घेतले असून १ जण पसार झाला. कह्यात घेतलेल्यामध्ये ३ धर्मांधांचा समावेश आहे. सोनई पोलीस ठाण्याने २६ एप्रिल या दिवशी ही कारवाई केली. (आरोपी धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यास गोहत्या रोखण्यात यश येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन आरोपींवर वरवरची कारवाई न करता कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावर धाड घातली. त्या वेळी साळवे आणि आल्हाट यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत ४० गोवंशीय दिसले. या जनावरांची कत्तल करण्याच्या हेतूने त्यांना आणण्यात आली आहेत. ही जनावरे इर्शाद कुरेशी, शन्या कुरेशी, बाबू पठाण आणि रवी आल्हाट यांच्या मालकीची असल्याचे साळवे याने सांगितले. त्यांची किंमत १६ लाख रुपये असल्याचे समजते.