मुंबईत अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाला आग !

जीवितहानी नाही 

मुंबई – २६ एप्रिलच्या मध्यरात्री फोर्ट परिसरातील बॅल्लार्ड इस्टेटमधील ‘कैसर-ए-हिंद’ इमारतीमधील ४ मजल्यावर असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाला आग लागली. मध्यरात्री २ वाजता आग लागल्यावर अग्निशमनदलाचे सैनिक घटनास्थळी उपस्थित झाले. सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.