‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी २ सहस्र लोकांना मेजवानी देणार्‍या इरफान सिद्दकी या काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद

  • केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अशांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे, तरच इतरांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात येईल !
  • काँग्रेसचे श्रेष्ठी सिद्दकी यांच्यावर काय कारवाई करणार, हे त्यांनी जनतेला सांगावे !

सरगुजा (छत्तीसगड) – येथील अंबिकापूरमध्ये २२ मार्च या दिवशीच्या ‘जनता कर्फ्यू’च्या वेळी २ सहस्र लोकांना पंचतारांकित ‘ग्रँड बसंत’ या हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नेते इरफान सिद्दकी आणि हॉटेलचे संचालक के.के. अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. रात्री उशिरापर्यंत ही मेजवानी चालू होती. येथे जेवण बनवण्यासाठी महाराष्ट्रातून स्वयंपाकी बोलावण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.