सिंधुदुर्ग : साटेली-भेडशी येथे घराचे मदरशात रूपांतर !

अवैध बांधकाम भूईसपाट करण्याची हिंदूंची मागणी !

  • बांधकामामुळे अडवलेला रस्ताही केला मोकळा 

  •  पोलीस घटनास्थळी उपस्थित 

प्रतिकात्मक चित्र

दोडामार्ग – थोरलेभरड, साटेली-भेडशी येथे एका व्यक्तीने घरासाठी अनुमती घेऊन प्रथम तेथे घर बांधले आणि नंतर त्या घराचे मदरशात रूपांतर केले. बाहेरील मुसलमान येथे सकाळी, दुपारी आणि रात्री नमाजपठण करत असत, तसेच अन्य राज्यांतील वाहनेही त्या ठिकाणी येत होती. याचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी २७ एप्रिल या दिवशी मदरशाच्या ठिकाणी जाऊन ‘येथे अवैध प्रकार चालणार नाहीत’, अशी चेतावणी दिली. येथे असलेल्या मुसलमान व्यक्तीकडे योग्य कागदपत्रे, तसेच आधारकार्डही नव्हते. (अवैधपणे रहाणार्‍या मुसलमानांविषयी पोलिसांना माहिती कशी नसते ? – संपादक) या बांधकामामुळे अडवलेला रस्ताही संतप्त नागरिकांनी मोकळा केला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी आले.

थोरलेभरड येथे काही परप्रांतीय मुसलमानांनी स्थानिक लोकांना पैशाचे आमीष दाखवून त्यांची भूमी घेतली आणि घरे बांधली आहेत. ही घरे बांधतांना ग्रामस्थांचे गावातील मूळ रस्ते बंद केले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून थोरलेभरड येथील काही ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच येथे एकाने घरासाठी अनुमती घेऊन घर बांधले आणि त्याचे मदरशात रूपांतर केले. या ठिकाणी चटई अंथरून नमाजपठण करण्यासाठी, तसेच बाहेर तोंड, हात,पाय धुण्याची व्यवस्था केली होती. ‘या बांधकामावर ग्रामपंचायतीने कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ‘काही महिलांनी या बांधकामामुळे आमचा रस्ता बंद झाला आहे’, असे सांगितल्यावर रस्ता मोकळा करण्यात आला.


  • दोडामार्ग आठवडा बाजारात परप्रांतीय मुसलमानांना व्यवसाय करण्यास विरोध 

  • पुन्हा दुकाने न लावण्याची दिली चेतावणी

दोडामार्ग –  शहरात २७ एप्रिलला भरलेल्या आठवडा बाजारात फळे, भाजीपाला, मिरची यांसह अन्य वस्तूंची विक्री करणार्‍या परप्रांतीय मुसलमान व्यावसायिकांना येथील संतापलेल्या हिंदूंनी दुकाने बंद करून जाण्यास सांगितले, तसेच पुन्हा येथे दुकाने लावायची नाहीत, अशी चेतावणी दिल्याचे वृत्त आहे.

पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल या संघटनांचे कार्यकर्ते येथील बाजारपेठेत एकत्र आले होते. या कार्यकर्त्यांनी दोडामार्ग बाजारपेठेत व्यवसाय करणार्‍या परप्रांतीय मुसलमानांच्या विरोधात भूमिका घेतली. या व्यावसायिकांना यापूर्वीही बाजारपेठेत व्यवसाय न करण्याविषयी खडसावण्यात आले होते. तरीही हे परप्रांतीय मुसलमान व्यावसायिक आठवडा बाजारात दुकाने लावत होते. त्यामुळे संतापलेल्या हिंदु युवकांनी त्यांना दुकाने बंद करायला सांगितले. या घटनेमुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


हिंदूंना कायमस्वरूपी घालवण्याचा डाव 

या घटनेनंतर बोलतांना काही ग्रामस्थांनी सांगितले की, एकंदर प्रकार पहाता येथील हिंदु कुटुंबांना त्रास देऊन त्यांना कायमस्वरूपी येथून घालवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत. हिंदूंची घरे हडप करून स्वत:ची पूर्ण वसाहत येथे निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. (हिंदूंनो सावधान ! – काश्मीर, त्यानंतर बंगालमध्ये अशीच स्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या अनेक भागांत जेथे अल्पसंख्यांकांची संख्या वाढते, तेथे  हिंदूंवर नंतर परागंदा होण्याची वेळ येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे होऊ नये, यासाठी सर्व हिंदूंनी आताच संघटित होणे आवश्यक आहे ! – संपादक)