१५ हून अधिक दुकानांचे रस्त्यावरील साहित्य जप्त !

हिंगोली – हिंगोली शहरात उघड्यावरील मांसविक्रीच्या दुकानांवर महापालिका प्रशासनाने २७ एप्रिल या दिवशी धडक कारवाई चालू केली असून १० दुकानदारांना नोटिसा दिल्या आहेत, तर १५ दुकानांचे रस्त्यावरील साहित्य जप्त केले आहे.
उघड्यावरील मांसविक्रीमुळे येथून ये-जा करणार्या नागरिकांनाही त्रास होत होता. तेथे दुर्गंधी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. महापालिकेनेही मांस विक्रेत्यांना सूचना केल्या; मात्र विक्रेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकाने कारवाईची मोहीम हाती घेतली.