भाजप नेत्यांचे विवाह ‘लव्ह जिहाद’मध्ये मोडत नाहीत का ?

छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा प्रश्‍न

रायपूर (छत्तीसगड) – मी भाजपच्या नेत्यांना विचारू इच्छितो की, ज्या भाजप नेत्यांच्या परिवारातील लोकांनी अन्य धर्मांमध्ये विवाह केले आहेत, ते ‘लव्ह जिहाद’च्या परिघात येत नाहीत का ? असा प्रश्‍न छत्तीसगडचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपला विचारला आहे.

भाजपशासित काही राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा बनवण्यात येणार आहे. त्यावरून त्यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. भाजप सरकारमधील मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांच्या पत्नी हिंदु आहेत.