संकष्टी चतुर्थीदिनी सहस्रो भाविकांनी श्री क्षेत्र ओझर (पुणे) येथील श्री विघ्नहराचे घेतले दर्शन !

अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे श्रीगणेश मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्त महाआरती करण्यात आली. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत रांगेत अनुमाने ५० सहस्र भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता !

१७ ऑक्टोबर म्हणजे आश्विन पौर्णिमेला रात्री छबिना मिरवणूक पार पडली. यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी जोगवा मागितला आणि त्यानंतर १५ दिवस चालू असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली.

दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता अभियान राबवून मंदिरावर भगवे ध्वज फडकावणार !

विहिंप यंदा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत किमान ५ सहस्र धार्मिक ठिकाणी ‘गाभारा ते अंगण स्वच्छता सेवा’ अभियान राबवणार आहे.

यंदाही जगाच्या पाठीवर युद्धजन्य परिस्थिती !- नगर येथील बिरोबा देवस्थान येथील भाकित

प्रसिद्ध बिरोबा देवस्थान येथे १७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या होईकात (भविष्यवाणी) १० खंडांत चळवळ होऊन दिनमान काळा होणार असल्याचे म्हणजेच सर्वच क्षेत्रांत चळवळी होऊन अस्थिरता निर्माण होणार असल्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे

‘Jersey Animals’ Outside Temples : मुंबईत मंदिरांबाहेर गोग्रासासाठी देशी गायींऐवजी ‘जर्सी प्राणी’ बांधून हिंदूंची दिशाभूल !

जर्सी प्राण्‍यांना ‘गोमाता’ म्‍हटले जात नाही. सद्य:स्‍थितीत अनेकांना याविषयी माहिती नसल्‍याचा गैरफायदा उठवून पैसे कमवणारे लोक गोमातेऐवजी जर्सी प्राण्‍यांना मंदिरांबाहेर बांधत आहेत. हिंदूंनो, हे तुम्‍हाला ठाऊक आहे का ?

मिरज येथील श्री अंबाबाई मंदिराच्या सुशोभिकरणासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत २ कोटी रुपये मिळवून देणार ! – डॉ. सुरेश खाडे, पालकमंत्री

मिरज येथील ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिर आणि सभागृह सुशोभिकरणासाठी एकूण ५ कोटी १८ लाख रुपये मान्य झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील २ कोटी रुपयांच्या कामाचे भूमीपूजन डॉ. खाडे यांच्या हस्ते झाले.

परळी वैजनाथ मंदिराच्या शिखराजवळील भिंत पाडून शिवलिंग दर्शनासाठी खुले !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी ५वे ज्योतिर्लिंग असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभु वैद्यनाथ मंदिरात तोडफोड करण्यात आली. मंदिराच्या शिखराच्या पायथ्याला एक शिवलिंग होते.

Rajasthan High Court : मंदिरे ही विश्‍वस्‍तांची वैयक्‍तिक मालमत्ता नव्‍हे !

एका महिलेने मंदिराच्‍या प्रतिबंधित भागात प्रवेश केल्‍यावरून मंदिराच्‍या विश्‍वस्‍तांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्‍यामुळे महिलेच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.

Kerala HC Prohibited Filming In Temples : हिंदूंच्‍या मंदिरांत अधार्मिक चित्रपटांचे चित्रीकरण होता कामा नये !

हिंदूंच्‍या मंदिरांच्‍या सरकारीकरणाचेच हे दुष्‍परिणाम होत. यासाठी आता सर्वत्रच्‍या हिंदूंनी संघटित होऊन विरोध केला पाहिजे आणि मंदिरे चांगल्‍या हिंदु भक्‍तांच्‍या नियंत्रणात देण्‍यासाठी सरकारांना भाग पाडले पाहिजे.

Rope-way At Nimgaon Khandoba : निमगाव खंडोबा देवस्थान परिसरात रोप-वे उभारणार !

भूमी कह्यात घेतल्यानंतर ३ वर्षांच्या आत संमत प्रयोजनासाठी भूमीचा वापर चालू करणे, तसेच या भागात वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे.