भारताच्या दौर्यावर असणार्या अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय गुप्तचर’च्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांचे विधान

नवी देहली – इस्लामी आतंकवाद जगासाठी चिंतेचे एक प्रमुख कारण आहे. बांगलादेशात हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आणि इतर लोक बर्याच काळापासून दुर्दैवी छळ, हत्या यांचा सामना करत आहेत. अमेरिकेसाठीही हा चिंतेचा विषय बनला आहे. राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन या विषयावर सतत चर्चा करत आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय गुप्तचर’च्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांनी भारतात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.
भारतात जगभरातील उच्च गुप्तचर अधिकार्यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी तुलसी गॅबर्ड भारतात आल्या आहेत. या परिषदेचे अध्यक्षस्थान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भूषवले. या परिषदेत आतंकवाद आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांमुळे निर्माण होणार्या धोक्यांसह विविध सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.