Jakarta Murugan Temple Indonesia : पाकिस्तानात मंदिर बांधले असते, तर ते उद्ध्वस्त केले असते ! – पाकिस्तानचा थयथयाट

सर्वाधिक मुसलमान असणार्‍या इंडोनेशियात भव्य मुरुगन मंदिर बांधल्याचे प्रकरण

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील भगवान मुरुगन यांचे भव्य मंदिर !

जकार्ता (इंडोनेशिया) – सर्वाधिक मुसलमान असणारा इस्लामी देश असणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील भगवान मुरुगन यांचे भव्य मंदिर नुकतेच भाविकांसाठी उघडण्यात आले आहे. सुमारे ४ सहस्र चौरस मीटर क्षेत्रफळावर हे मंदिर व्यापले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.

यानंतर पाकिस्तानमध्ये या मंदिरावरून टीका होत आहे. ‘पाकमध्ये हिंदूंचे मंदिर बांधले, तर ते उद्ध्वस्त केले जाईल’, अशी धमकी दिली जात आहे.

पाकिस्तानच्या एका मौलानाचा (इस्लामच्या अभ्यासकाचा) मशिदीतील शुक्रवारच्या नमाजपठणानंतरच्या भाषणाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात हा मौलाना म्हणतो की, संयुक्त अरब अमिरातमध्ये हिंदु मंदिर बांधण्यात आले. सौदी अरेबिया जिथे एक ‘स्मार्ट सिटी’ बांधली जात आहे, तिथेही एक मंदिर बांधले जाणार आहे आणि आता इंडोनेशियातही भव्य मंदिर बांधण्यात आले. इंडोनेशिया आधीच हिंदु राष्ट्र होते; पण ते आता इस्लामी राष्ट्र आहे. अल्लाचा धर्म खरा आहे. अल्लाचा धर्मच योग्य आहे. याखेरीज कोणताही धर्म असो, तो चुकीचा आहे. केवळ एकच धर्म आहे इस्लाम. (कुठे ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (सर्व पृथ्वी एक कुटुंब आहे) असे सांगणारा हिंदु धर्म, तर कुठे ‘केवळ आमचाच धर्म श्रेष्ठ’ असे सांगणारे अन्य धर्म ! – संपादक) पाकिस्तानात मंदिर बांधणे शक्य नाही. जर इथे मंदिर बांधले, तर लोक ते उद्ध्वस्त करतील. मंदिरे पाडली पाहिजेत. जिथे मंदिरे आहेत तिथे ती पाडली पाहिजेत.

संपादकीय भूमिका

  • यातून पाकिस्तान्यांची मानसिकता पुन्हा उघड होते ! अशा पाकसमवेत मैत्री करण्याचे, बंधूभाव ठेवण्याचे प्रयत्न काँग्रेससहित अन्य हिंदुविरोधी राजकीय पक्षांनी केले. त्यांनी याविषयी आता तोंड उघडले पाहिजे !
  • भारतात अनधिकृत  मशिदीवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला १० वेळ विचार करावा लागतो आणि कृती करण्यासाठी मोठा फौजफाटा न्यावा लागतो; मात्र पाकिस्तानात उघडपणे हिंदूंचे अधिकृत मंदिरही पाडण्याची धमकी उघडपणे दिली जाते !