
केंजळ (भोर, पुणे), १७ मार्च (वार्ता.) – देशामध्ये विविध राज्यांत, भागांत अनेक हिंदु युवती आणि महिला लव्ह जिहादच्या विळख्यात अडकून त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. प्रत्येक हिंदु माता-भगिनींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे आणि ‘लव्ह जिहाद’पासून सावध रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. केंजळ, तालुका भोर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद : एक भीषण समस्या’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. ८ मार्च या दिवशी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून अनेक धर्मप्रेमींनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला १०० हून अधिक महिला, युवती आणि युवक उपस्थित होते.
कु. क्रांती पेटकर म्हणाल्या की,
राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी पद्मावती, अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांचा शौर्यशाली इतिहास आपल्याला लाभला आहे. यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक हिंदु महिलेने धर्माचरण करून आत्मबल वाढवून स्वतः मधील शौर्य जागृत करणे आवश्यक आहे.