दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पॉल माशाटाइल उपस्थित !
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – येथे श्री स्वामीनारायण हिंदु मंदिर आणि सांस्कृतिक संकुल यांचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण’ (बी.ए.पी.एस्.) चे जागतिक आध्यात्मिक गुरु प.पू. महंत स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. हे भव्य हिंदु संकुल दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर आणि सांस्कृतिक संकुल बनले आहे. साडेचौदा एकर भूमीवर बांधलेले हे भव्य मंदिर कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचे केंद्र आहे, जे हिंदु परंपरा अन् समृद्ध वारसा यांचेे प्रतिबिंब आहे.
या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पॉल माशाटाइल उपस्थित होते. त्यांनी देशाच्या सांस्कृतिक विविधतेला बळकटी देण्यासाठी आणि समुदायांमध्ये परस्पर समन्वय वाढवण्यासाठी हे मंदिर एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, अशा प्रकारे त्याचे वर्णन केले. यामुळे देशाची एकता आणखी वाढेल, असेही ते म्हणाले.