रशिया-युक्रेन युद्धात पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना अण्वस्त्रे वापरण्यापासून रोखल्याने आम्ही कृतज्ञ आहोत !

पोलंडचे उप-परराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्टोस्झेव्स्की यांचे विधान

पोलंडचे उप-परराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्टोस्झेव्स्की

नवी देहली – रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी पोलंड कृतज्ञ आहे. पंतप्रधान मोदी यांनीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अण्वस्त्रेे वापरू नयेत, यासाठी तयार केले होते. हे स्पष्ट आहे की, जर हे घडले नसते, तर कदाचित् रशियाचे राष्ट्राध्यक्ष काही मोठे पाऊल उचलू शकले असते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रांचा वापर समाविष्ट असता, अशी माहिती पोलंडचे उप-परराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्टोस्झेव्स्की यांनी दिली. ते येथे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

बार्टोस्झेव्स्की पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांचा पोलंड दौरा खूप छान होता. आम्हाला युक्रेनमध्ये कायमस्वरूपी शांतता हवी आहे. कुणालाही युद्ध नको आहे.