वणी (जिल्हा यवतमाळ) येथे बजरंग दल गोरक्षकांकडून ७० गोवंशियांची मुक्तता !

मध्यप्रदेशातून तेलंगाणा येथे कंटेनरमधून होणार्‍या गोतस्करीचे प्रकरण

वणी (यवतमाळ), १७ मार्च (वार्ता.) – येथील पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि बजरंग दलाच्या गोरक्षकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १७ मार्चला दुपारी २ वाजता ७० गोवंशियांची मुक्तता करण्यात आली. मध्यप्रदेशातून तेलंगाणा येथे कत्तलीसाठी होणारी गोवंशियांची तस्करी बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक श्री. संतोष लकशेट्टीवार आणि स्थानिक पोलीस यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या गोवंशियांना रासा येथील गुरुमाऊली गोरक्षण संस्थेच्या कह्यात देण्यात आले.

संपादकीय भूमिका

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !