Tirupati Laddu Case : तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूतील भेसळीच्या प्रकरणी ४ जणांना अटक

तुपाच्या पुरवठ्याचे कंत्राट मिळण्यासाठी डेअरी मालकाने बनावट कागदपत्रे बनवल्याचे उघड !

प्रसादाच्या लाडूतील भेसळीच्या प्रकरणी अटक झालेले चार पुरवठेदार !

नवी देहली : तिरुपती येथील मंदिराच्या लाडूच्या प्रसादातील भेसळीच्या प्रकरणी सीबीआयने ४ जणांना अटक केली. भोले बाबा डेअरीचे माजी संचालक विपिन जैन आणि पोमिल जैन, वैष्णवी डेअरीचे अपूर्व चावडा अन् एआर् डेअरीचे राजू राजशेखरन् अशी त्यांची नावे आहेत. प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी तुपाच्या पुरवठ्यात अनियमितता आढळल्यानंतर या चौघांनाही अटक करण्यात आली.

सीबीआयला चौकशीत असे आढळले की,

वैष्णवी डेअरीच्या प्रतिनिधींनी एआर् डेअरीच्या नावाने निविदा मिळवल्या होत्या. वैष्णवी डेअरीने निविदा प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी एआर् डेअरीचे नाव वापरून बनावट कागदपत्रे सिद्ध केली होती. वैष्णवी डेअरीने बनवलेल्या बनावट नोंदींमध्ये दावा करण्यात आला होता की, त्यांनी रुरकी येथील भोले बाबा डेअरीकडून तूप खरेदी केले होते; परंतु आवश्यक प्रमाणात पुरवठा करण्याची क्षमता त्यांच्याकडे नव्हती.