गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती !

‘फेस’ रिडींगद्वारे गुन्हेगार ओळखणार !
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – राज्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशीअल इंटेलिजन्स) उपयोग असलेले ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून ‘फेस रिडिंग’द्वारे (चेहर्याचे निरीक्षण करून) गुन्हेगारांची ओळख होईल, तसेच कुणाकडे शस्त्र असल्यास तेही या कॅमेर्यांमध्ये स्कॅन होणार आहे, अशी माहिती राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे येथील बिघडलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित केली. त्यावर उत्तर देतांना योगेश कदम यांनी ही माहिती दिली.