
बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली), १ फेब्रुवारी (वार्ता.) – देवस्थानच्या शेतभूमी बर्याच प्रमाणात ‘लँड ग्रबिंग’द्वारे अवैधरित्या हडपल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबींग’ कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा, या मागणीचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन तहसीलदार सौ. शामला खोत-पाटील यांनी स्वीकारले. या प्रसंगी सर्वश्री विशाल पाटील, अशोक मस्कर, श्री. विशाल गुरव, श्री. विलास पाटील, श्री. निवास गुरव, श्री. अमोल गुरव, कोल्हापूर जिल्हा मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.