होटगी (तालुका दक्षिण सोलापूर) येथील श्री शंकेश्‍वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधी देऊ !

श्री शंकेश्‍वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधी देऊ, असे आश्‍वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिले आहे. ‘होटगी ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ४ मधील श्री शंकेश्‍वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात यावा आणि मंदिराची संरक्षक भिंत सिद्ध करण्यात यावी’, या मागणीचे ग्रामस्थांनी आमदार देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या शिवलिंगावर पंचामृताऐवजी केवळ शुद्ध दुधाचा अभिषेक करावा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

ध्यप्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्‍वर ज्योर्तिंलिंग मंदिरातील शिवलिंगाची झीज होण्यापासून थांबवण्यासाठी त्यावर शिवभक्तांनी पंचामृताचा अभिषेक करू नये. शिवलिंगावर शुद्ध दुधाने अभिषेक करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

संभाजीनगर येथे मंदिर उघडण्याच्या मागणीवरून एम्.आय.एम्. राजकारण करत असल्याचा शिवसेनेचा आरोप

धार्मिक स्थळे उघडण्याच्या सूत्रावरून १ सप्टेंबर या दिवशी येथील शिवसैनिक आणि एम्.आय.एम्.चे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. पोलिसांच्या आश्‍वासनानंतर एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी मंदिरांमध्ये जाऊन निवेदन देण्याचे रहित केले.

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.

हरिद्वार येथील ‘हर की पौडी’ येथे वीज कोसळून ८० फूट लांब भिंत कोसळली

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ‘हर की पौडी’ गावातील ब्रह्मकुंडजवळ २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली; मात्र येथील मंदिर सुरक्षित राहिले.

शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्यामागील वस्तूनिष्ठ इतिहास

१३.५.२०२० या दिवशी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ५५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने…

आंध्रप्रदेशातील तिरुपती, श्रीकालहस्ती आणि कनिपक्कम् या ३ मोठ्या मंदिरांच्या मालकीच्या इमारतींचा कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी वापर !

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर हिंदूंच्या मंदिराच्या इमारती प्रशासनाला वापरण्यास दिल्या जात आहेत; मात्र अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांकडून अशा प्रकारे इमारती देण्यात आल्याचे वृत्त ऐकिवात येत नाही, असे का ?

कोरोनारूपी असुराचा समूळ नायनाट करण्यासाठी रत्नागिरीत कालभैरवाला गार्‍हाणे

कोरोना संकटातून संपूर्ण रत्नागिरीसह तमाम जनतेला मुक्त करावे. कोरोना विषाणूची बाधा कोणालाही होऊ नये आणि रत्नागिरीतल्या नागरिकांना कायद्याच्या शिस्तीचे पालन करण्याची सबुद्धी प्राप्त होवो.

अयोध्येत तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात रामललाची स्थापना

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्‍या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.