Peta Gifted Robotic Elephant : ‘पेटा’ने त्रिशूर (केरळ) येथील कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिराला दान केला यांत्रिक हत्ती !

(‘पेटा’, म्हणजेच ‘पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ (प्राण्यांना नैतिक पद्धतीने वागवण्यासाठी प्रयत्नरत लोक))

‘पेटा’ने दान केलेला यांत्रिक हत्ती

त्रिशूर (केरळ) – प्राणीप्रेमाच्या नावाखाली केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करणार्‍या ‘पेटा इंडिया’ने त्रिशूरमधील कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिराला ‘कोंबरा कन्नन’ नावाचा एक पूर्ण आकाराचा यांत्रिक हत्ती दान केला आहे. या यांत्रिक हत्तीचा वापर आता मंदिर समारंभांमध्ये केला जाईल. ‘क्रौर्यमुक्त’ असल्याचा दावा करूनही ‘पेटा’चा हा उपक्रम इतर धर्मांच्या प्रथांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्याच्या आणि केवळ हिंदु सण अन् विधी यांना लक्ष्य करण्याच्या निरंतर पद्धतीचे प्रतिबिंब आहे.

१. ‘केरळच्या मंदिर संस्कृतीत खोलवर रुजलेली परंपरा असलेल्या जिवंत हत्तींची मालकी कधीही न घेण्याच्या किंवा भाड्याने न घेण्याच्या मंदिराच्या निर्णयाच्या सन्मानार्थ ही देणगी देण्यात आली आहे’, असा दावा ‘पेटा’ने केला आहे.

२. सितारवादक अनुष्का शंकर यांनी याविषयी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘‘कोंबरा कन्नन’सारखे यांत्रिक हत्ती खर्‍या हत्तींना त्यांच्या मूळ अधिवासात कुटुंबांसह भरभराटीस येण्यास साहाय्य करतील.’’

३. याविषयी समीक्षकांचा असा युक्तीवाद आहे की, ‘पेटा’च्या अशा हस्तक्षेपांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना धक्का बसतो, शतकानुशतके जुन्या विधींना आधुनिकतेच्या नावाखाली टाकाऊ मानले जाते.

४. प्राण्यांच्या हक्कांसाठीचा ‘पेटा’चा हा उत्साह निवडकपणे लागू होतो, असे दिसते. ही संस्था हिंदु परंपरांना सातत्याने लक्ष्य करते आणि इतर धार्मिक प्रथांमध्ये समान मुद्यांवर  स्पष्टपणे मौन बाळगते.


हे ही वाचा → संपादकीय : सांस्कृतिक अतिक्रमण !


५. प्राचीन आध्यात्मिक केंद्र असलेले कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिर केरळच्या चैतन्यशील मंदिर वारशाचे प्रतीक आहे. मंदिराची प्रमुख देवता भगवान श्रीकृष्ण आहेत.

६. ‘पेटा’ मंदिरांमध्ये आणि जल्लीकट्टूसारख्या उत्सवांमध्ये हत्तींचा वापर करण्याच्या  पारंपरिक हिंदु प्रथांना लक्ष्य करते, तर इतर धर्मांमधील समान प्रथांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करते. उदाहरणार्थ हिंदु सणांमध्ये प्राण्यांच्या बलीदानाच्या विरोधात मोहीम राबवतांना ‘पेटा’वर बकरी ईदमधील प्रथांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

केवळ हिंदूंचे सण-उत्सव आणि धार्मिक पंरपरा यांवर घाला घालणारी ‘पेटा’!