भोसरी येथे ‘गोहत्यामुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन !

भोसरी (पुणे), १७ मार्च (वार्ता.) – ज्या शिवरायांनी गोहत्या करणार्या कसायाचे हात छाटले, आज त्यांच्याच जन्मभूमी जवळ असलेल्या ‘बेल्हा’ या गावातून ‘गोमांस’ निर्यात होत आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना कसायांची हिंमत कशी होते ? आता यावर महाराष्ट्र सरकार काय कारवाई करणार आहे ? असा प्रश्न भाग्यनगरचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी सरकारला केला. भोसरी येथे ‘गोहत्या मुक्त हिंदुस्थान होण्यासाठी महायज्ञ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते. बजरंग दल गोरक्षा विभाग, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, पुणे पांजरपोळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
![]() |
![]() |
आमदार महेश लांडगे यांचे भाषण | उपस्थित जनसमुदाय |
![]() |
![]() |
आमदार टी. राजासिंह यांना सनातन प्रभात चा अंक भेट देताना वार्ताहर साधक श्री जयेश बोरसे | आमदार महेश लांडगे यांना सनातन प्रभात चा अंक भेट देताना वार्ताहर साधक श्री जयेश बोरसे |
आमदार टी. राजासिंह ठाकूर पुढे म्हणाले की, ज्या शिवरायांच्या मावळ्यांनी गायीच्या रक्ताचा थेंब कुणी जरी वाहिला, तरी ते गोहत्या करणार्याच्या रक्ताचे पाट वाहू घालायचे अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात गोरक्षकांना, गोहत्या थांबावी म्हणून संघर्ष करावा लागत आहे. जिथे शिवरायांचा जन्म झाला, त्या पुण्यभूमीच्या जवळच असलेल्या बेल्हा या गावातून गोमांस निर्यात होत आहे, ही पुष्कळ वेदनादायक गोष्ट आहे. ३३ कोटी देवतांचा वास गोमातेमध्ये आहे, म्हणून गोसेवा केल्याने पुण्य अधिक लाभते. आज गोमातेच्या आशीर्वादामुळे मी आमदार आहे.
![]() |
![]() |
सुरभी यागाची पूर्णाहुती | श्री. विलास मडेगिरी, भाजप हे सनातनच्या उत्पादनांची माहिती घेतांना |
क्षणचित्रे
१. गोहत्यामुक्त भारत होण्यासाठी ‘गोरक्षा सुरभी याग’ या वेळी करण्यात आला होता, त्याचे पौरोहित्य गायत्री परिवार यांनी केले.
२. महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोसेवक यांचा सन्मान केला.
३. आमदार टी. राजासिंह ठाकूर आणि आमदार महेश लांडगे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. जयेश बोरसे यांनी ‘सनातन प्रभात’चा अंक भेट दिला.
४. सनातनची उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष या वेळी लावण्यात आला, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मालेगाव, मुंब्रा होऊ द्यायचा नव्हता, यासाठी कुदळवाडी येथील कारवाई आवश्यक होती ! – महेश लांडगे, आमदार, भाजप
कुदळवाडी तसेच चिखली हा परिसर मालेगाव, मुंब्रा होण्याच्या वाटेवर होता. त्यामुळेच कुदळवाडी आणि चिखली येथील अतिक्रमण निर्मूलन कारवाईची आवश्यकता होती. ज्याप्रमाणे अफझलखानाच्या थडग्या भोवतीचे अतिक्रमण काढले गेले, तसेच आता औरंग्याची थडगे नष्ट करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार.