पुणे – बांधकाम ठेकेदाराने सादर केलेले देयक मान्यता, तसेच कामाची पहाणी करून अहवाल देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १ लाख ४२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील (दक्षिण) कार्यकारी अभियंता बाबूराव पवार, दौंड-शिरूर उपविभागातील उपअभियंता दत्तात्रय पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकालाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !
|