वर्ष २०१८ च्या तुलनेत वर्ष २०१९ मध्ये दंगली, हत्या, बलात्कार आदींच्या घटनांत अल्प प्रमाणात घट ! – केंद्र सरकारचा दावा

देशातील गुन्हेगारीत अल्प प्रमाणात घट होण्याऐवजी ते पूर्णपणे रोखणे हेच लक्ष्य असले पाहिजे, तरच समाज सुरक्षित आणि शांततेत जगू शकेल !

देशात महिलांच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भारतीय स्त्री ही शालीन, सोज्वळ आणि पवित्र समजली जात होती; मात्र या सर्वेक्षणातून भारतीय महिलांचे झपाट्याने होत असलेले अधःपतन आपल्या लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे.

(म्हणे) ‘मोदी सरकार आल्यापासून भारतात लोकांना मिळणारे स्वतंत्र्य घटले !’ – अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’चा अहवाल

अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असतांना या अमेरिकी संस्थेने प्रथम तेथील लोकांच्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी. भारतात कुणाला किती स्वातंत्र्या द्यायचे, याची काळजी घ्यायला भारतीय समर्थ आहेत !

फ्रान्समध्ये पाद्रयांनी १० सहस्र मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा अंदाज

अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी मूग गिळून गप्प बसलेले असतात ! प्रेम आणि शांती यांचे पुजारी असलेल्या पाद्रयांचे वासनांध स्वरूप ! असे पाद्री शांती आणि सहिष्णुता यांच्या गप्पा मारतात, हे संतापजनक !

पुणे येथील ७५ टक्के मुले-मुली सोळाव्या वर्षाआधीच ‘रिलेशनशिप’मध्ये

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. हिंदु संस्कृतीपासून दूर जाऊन पाश्‍चात्त्य संस्कृतीशी जवळीक साधल्यामुळे त्याचे समाजात घडणारे दुष्परिणाम पुनःपुन्हा पुढे येऊ लागले आहेत.

जगाच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के वाहने असतांना रस्ते अपघातात १० टक्के लोकांचा मृत्यू होतो ! – जागतिक बँक

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी जनतेचे प्रबोधन केले नाही किंवा त्यांना शिस्त लावली नाही, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अत्यंत दयनीय !  

याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत; मात्र भारतातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर दगड भिरकावण्यात आल्याची अफवा जरी पसरली, तरी हिंदूंना लगेच ‘तालिबानी’, ‘असहिष्णु’ ठरवून ते मोकळे होतात !

काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भारतात १ पोलीस कर्मचारी करतो ६४१ लोकांची सुरक्षा !

१ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस ! देशातील लोकांची सुरक्षा पहाता नेते अधिक सुरक्षित आहेत, हेच लोकांना दिसते ! लोकशाहीमध्ये जनतेची सुरक्षा वार्‍यावर असणे लज्जास्पद !

पर्यटनवृद्धीसाठी केलेल्या ‘इव्हेंट’च्या आयोजनात गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून विरोधकांनी शासनाला धारेवर धरले

राज्य पर्यटन खात्याने देशविदेशात पर्यटनवृद्धीसाठी ‘इव्हेंट’चे आयोजन केले. या आयोजनात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या वेळी उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना विरोधकांनी धारेवर धरले.