पतीकडून लैंगिक सुख मिळत नसल्याने वाढ
भारतीय स्त्री ही शालीन, सोज्वळ आणि पवित्र समजली जात होती; मात्र या सर्वेक्षणातून भारतीय महिलांचे झपाट्याने होत असलेले अधःपतन आपल्या लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. साधना शिकवली असती, तर महिला आणि पुरुष दोघांनी धर्माचरण केले असते आणि त्यांचे अधःपतन झाले नसते !
नवी देहली – भारतातील ३० ते ६० वटोगटातील महिलांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४८ टक्के महिलांचे विवाहबाह्य संबंध आहेत, असे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात केवळ विवाहबाह्य नव्हे, तर या संबंधांमुळे मुले झालेल्या महिलांचाही समावेश आहे.
१. फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेंटिंग अॅप ‘ग्लिडन’कडून हे सर्वेक्षण करण्यात आले. भारतात याचे १३ लाख वापरकर्ते आहेत. ‘ग्लिडन’ अॅप अशा महिलांसाठी बनवण्यात आले आहे, ज्या एकतर आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा मग विवाहित आहेत. हे अॅप महिलांनीच महिलांसाठी बनवले असून प्रेम, शारीरिक संबध आणि मैत्री यांविषयी महिलांना साहाय्य करणे हा याचा उद्देश आहे.
Is that Bad News?https://t.co/GS6D2LWmcO
— News18 (@CNNnews18) March 7, 2021
२. महिलांच्या विवाहबाह्य संबंधांसाठी विविध कारणे असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या त्यांच्या लैंगिक आयुष्याविषयी समाधानी नाहीत. ६४ टक्के महिला त्यांच्या पतीकडून लैंगिक सुख मिळत नसल्याने विवाहबाह्य संबंध ठेवत आहेत.
३. विवाहबाह्य संबंधांमध्ये असणार्या ७६ टक्के महिला उच्चशिक्षित असून यांतील ७२ टक्के महिला स्वावलंबी आहेत.