पुणे – तिसरे अपत्य जन्माला घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे साहाय्य आयुक्त श्रीनिवास दांगट या साहाय्यक आयुक्तांना बडतर्फ करण्यात आले आहे. दांगट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षाच्या साहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते. १०० रुपयांच्या स्टँपवर किती अपत्य आहे, याचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी देणे बंधनकारक आहे; मात्र तसे पत्र नियुक्तीच्या वेळी दांगट यांनी सादर केले नाही, अशी तक्रार त्यांच्या विरोधात करण्यात आली होती. चौकशीनंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली आहे.