सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडसह ७ जिल्ह्यांत होणार कार्यक्रम
सिंधुदुर्ग – अनधिकृतरित्या केल्या जाणार्या मासेमारीस आळा घालणे, तसेच राष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने राज्याच्या जलक्षेत्रात ‘ड्रोन’द्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. यासाठी ‘ड्रोन’ आधारित देखरेख आणि ‘डिजिटल डेटा मेन्टेनन्स यंत्र’ प्रणाली घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांत या ‘ड्रोन प्रणाली’चे उद्घाटन ९ जानेवारी यादिवशी सकाळी १० वाजता मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय, मुंबई येथून केले जाणार आहे. याच वेळी जिल्ह्यातील देवगड किल्ला परिसरातूनही ‘ड्रोन’चे उड्डाण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.