फ्रान्समध्ये पाद्रयांनी १० सहस्र मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा अंदाज

  • कॅथोलिक चर्चनेच स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून उघड झालेले सत्य !

  • प्रत्यक्षात पीडित मुलांची संख्या कित्येक पटींनी अधिक असल्याचा समितीला संशय

  • अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी मूग गिळून गप्प बसलेले असतात, हे लक्षात घ्या !
  • प्रेम आणि शांती यांचे पुजारी असलेल्या पाद्रयांचे वासनांध स्वरूप ! असे पाद्री शांती आणि सहिष्णुता यांच्या गप्पा मारतात, हे संतापजनक !
कॅथोलिक चर्चने स्थापन केलेल्या चौकशी समितीचे प्रमुख जीन-मार्क सॉवे (डावीकडून तिसरे)

पॅरिस (फ्रान्स) – वर्ष १९५० पासून फ्रान्समधील चर्चच्या पाद्रयांच्या लैंगिक शोषणाला १० सहस्र मुले बळी पडली असावीत, अशी माहिती अल्पवयीन मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी करण्यासाठी कॅथोलिक चर्चने स्थापन केलेल्या चौकशी समितीचे प्रमुख जीन-मार्क सॉवे यांनी दिली.

१. सॉवे म्हणाले की, जून २०१९ मध्ये पीडित आणि या अत्याचारांचे साक्षीदार यांना त्यांच्या तक्रारी नोंद करण्यासाठी ‘हॉटलाईन’ स्थापन करण्यात आली होती. त्याद्वारे पहिल्या १७ मासांतच ६ सहस्र ५०० दूरध्वनी आले. आमच्यासाठी मोठा प्रश्‍न हाच आहे की, अत्याचार झालेल्यांपैकी नेमके किती पीडित पुढे आले आहेत ? ते २५ टक्के आहेत कि १० कि ५ टक्के किंवा त्यापेक्षा अल्प ?

२. मोठ्या प्रमाणात आणि वारंवार होणार्‍या बाल अत्याचारांच्या घटनांच्या चौकशीसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये फ्रान्सच्या बिशप्स कॉन्फरन्सने चौकशी समितीची स्थापना करण्यास सहमती दर्शवली होती. या समितीतीत कायदेशीर, शैक्षणिक आणि वैद्यकीय पार्श्‍वभूमी असलेल्या २० हून अधिक तज्ञांचा समावेश असलेल्या या चौकशी समितीचा अहवाल २०२० च्या शेवटी देण्यात येणार होता; परंतु यावर्षी सप्टेंबरपर्यंत समितीची मुदत वाढवण्यात आली आहे.