गेल्या ७ वर्षांत सैन्यातील ८०० सैनिकांची आत्महत्या !

मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे सैनिक जनतेचे रक्षण तरी कसे करू शकणार ? सैनिक साधना करत नसल्याने ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्थिर कसे रहायचे’, हे त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे ते अशा प्रकारचे पाऊल उचलतात !

वर्ष २०१८ च्या तुलनेत वर्ष २०१९ मध्ये दंगली, हत्या, बलात्कार आदींच्या घटनांत अल्प प्रमाणात घट ! – केंद्र सरकारचा दावा

देशातील गुन्हेगारीत अल्प प्रमाणात घट होण्याऐवजी ते पूर्णपणे रोखणे हेच लक्ष्य असले पाहिजे, तरच समाज सुरक्षित आणि शांततेत जगू शकेल !

खासदार स्थानिक क्षेत्र योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खासदाराला प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या ५ कोटी रुपयांचा योग्य विनियोग होतो का ?

लोकसभेतील ५४२ खासदार आणि राज्यसभेतील अनुमाने३०० खासदार यांच्यासाठी प्रत्येकी ५ कोटी, म्हणजे सहस्रो कोटी रुपये व्यय होतात. या निधीचे नियोजन कसे होते ? योजना चालू करण्याचा उद्देश यशस्वी होतो का ?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह जे बोलले होते ते मला करावे लागत आहे !  

तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की, ‘जे मनमोहन सिंह बोलले होते ते मोदीला करावे लागत आहे’, असे तुम्ही म्हटले पाहिजे’, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.

सरकार दीप सिद्धू याला अटक करत नाही; मात्र २०० शेतकर्‍यांना अटक करते ! – संजय राऊत यांची राज्यसभेत सरकारवर टीका

आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवले जाते.

शेतकर्‍यांच्या सूत्रांवरून राज्यसभेत गोंधळ घालणारे आपचे ३ खासदार दिवसभरासाठी निलंबित

गोंधळ घालणार्‍या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !

कृषी कायद्यांवर चर्चा करण्यावरून झालेल्या गोंधळामुळे राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित !

जसे वर्गात गोंधळ घालणार्‍या मुलांना शिक्षा केली जाते, त्याच प्रकारे संसदेत गोंधळ घालणार्‍या सदस्यांवर कारवाई होणे आवश्यक ! संसदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे होणार्‍या पैशांचा अपव्य लक्षात घेता हा निधीही अशा बेशिस्त सदस्यांकडून वसुल करा !

हा नियम मुसलमान लोकप्रतिनिधींना लागू असेल का ?

‘वर्ष १९५१ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. वर्ष २०११ मध्ये ती १२१ कोटींहून अधिक झाली, तर २०२५ पर्यंत ती १५० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. देशातील जन्मदर वाढला; पण साधनांमध्ये तुलनेने काही वाढ झालेली नाही