पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सत्प्रेरणेने श्री योग वेदांत सेवा समितीकडून आयोजन
जालना, ८ जानेवारी (वार्ता.) – जालना शहरात भव्य संकीर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आशीर्वाद स्वरूप अखंड दिव्य ज्योतीसह उत्साहपूर्ण साधकांचा समावेश होता.
संकीर्तन यात्रेमध्ये पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू प्रेरित २५ डिसेंबरला तुलसी पूजनदिन, तसेच १४ फेब्रुवारीला मातृपितृपूजन दिन साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. अखंड दिव्य ज्योतीचे स्वागत अंबड चौफुली येथे साधकांद्वारे करण्यात आले. त्यानंतर अंबड चौफुली येथून संकीर्तन यात्रा शनिमंदिरमार्गे आली. गांधी चमन येथे भव्य आरतीचे आयोजन झाले. त्यानंतर संकीर्तनाला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून जातांना आझाद मैदानाजवळील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आरती करून संकीर्तन यात्रेचा समारोप झाला.