मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत १० जानेवारीला हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने ‘हिंदू गर्जना सभा’ !

पत्रकार परिषदेत माहिती देतांना श्री. नितीन शिंदे, तसेच अन्य

कोल्हापूर, ८ जानेवारी (वार्ता.) – राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे हे १० जानेवारीला सांगली दौर्‍यावर येत आहे. यात सकाळी ११ वाजता माजी नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांनी पाठपुरावा केलेल्या विकासकामांचे उद्घाटन, दुपारी १२ वाजता हिंदू व्यावसायिक संघाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि त्यानंतर मराठा सेवा संघाच्या कार्यालयात ‘हिंदू गर्जना सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे, माजी नगरसेविका सौ. स्वाती शिंदे, श्री. श्रीरंग केळकर आणि भाजपच्या सौ. नीता केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सर्वश्री अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, मनोज साळुंखे, गजानन मोरे यांसह अन्य उपस्थित होते.