Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदू अल्पसंख्य होण्याआधी हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे ! – स्वामी महेशानंद गिरिजी महाराज

प्रयागराज कुंभपर्व २०२५

महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्वामी महेशानंद गिरिजी महाराज, पंचायती आखाडा

महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्वामी महेशानंद गिरिजी महाराज यांचा सन्मान करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रयागराज, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने वक्फ बोर्डाला हटवून सनातन बोर्डाची स्थापना करावी, असा निर्धार करण्यात आला आहे. त्याविषयी आम्ही बैठका घेऊन जागृती करत आहोत. भारत हा राज्यघटनेनुसार हिंदु राष्ट्र नाही. आज आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमत हवे आहे. तसे झाल्यानंतर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येईल. हिंदु राष्ट्र होणे अत्यावश्यक झाले आहे. असे झाले नाही, तर येत्या काळात हिंदू अल्पसंख्य होतील आणि अन्य धर्मीय १०० कोटी होतील, असे स्पष्ट मत अखिल भारतीय सनातन परिषदेचे अंतरराष्ट्रीय प्रवक्ते महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्वामी महेशानंद गिरिजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट आणि समितीचे श्री. सुनील कदम यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा समितीच्या वतीने सन्मान केला. त्या वेळी त्यांनी समितीच्या कार्यासाठी आशीर्वाद दिले. या प्रसंगी उपस्थित श्री पंचदाशनाम जुना आखाडा सचिव महामंडलेश्‍वर रामेश्‍वरगिरिजी महाराज, श्री पंचदाशनाम जुना आखाडा सचिव महामंडलेश्‍वर शैलेन्द्रगिरिजी महाराज आणि श्री पंचदाशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर मनोज गिरिजी महाराज यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान करण्यात आला.

मनोगत व्यक्त करतांना महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्वामी महेशानंद गिरिजी महाराज
(डावीकडून) श्री पंचदाशनाम जूना आखाडा सचिव महामंडलेश्‍वर रामेश्‍वरगिरीजी महाराज, श्री पंचदाशनाम जूना आखाडा सचिव महामंडलेश्‍वर शैलेन्द्रगिरिजी महाराज आणि श्री पंचदाशनाम जूना आखाड्याचे महामंडलेश्‍वर मनोजगिरिजी महाराज यांचे आशीर्वाद घेतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि बाजूला श्री. सुनील घनवट

महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्वामी महेशानंद गिरिजी महाराज पुढे म्हणाले की,

१. बांगलादेशात हिंदूंची संख्या अल्प झाली, त्यामुळे हिंदुंवर अत्याचार झाले.

२. आज पालक मुलांना हुशार आणि सुंदर बनवण्याच्या मागे लागले आहेत. त्यांना स्वतःचे रक्षण कसे करायचे, हे शिकवले पाहिजे.

३. ‘मंदिरे निश्‍चित मुक्त होतील’, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. याविषयी सर्व संत-महंत कार्य करत आहेत.