समितीच्या कार्याला अनेक आशीर्वाद

प्रयागराज, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाकुंभक्षेत्री विविध संत-महंतांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी संत-महंतांनी समितीच्या कार्याला अनेक आशीर्वाद दिले.
संत-महंतांनी व्यक्त केलेले अभिप्राय !
१. महंत श्री राजू दास महाराज जी, सिद्धपीठ हनुमान गढी मंदिर, अयोध्या धाम, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘हिंदु सुरक्षा सेवा ट्रस्ट’
‘पूर्वी ८ इस्लामी राष्ट्रे असलेल्या या विश्वात आज ५७ इस्लामी राष्ट्रे आहेत. आपल्या पूर्वजांनी धर्मासाठी बलीदान दिले, म्हणून आपली सनातन हिंदु संस्कृती जिवंत आहे. हिंदु राष्ट्रासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी कार्य करायला हवे. आता नाही, तर कधीच नाही !’
२. महामंडलेश्वर गिरिधरजी महाराज, सूरत बंगला, हरिद्वार

‘हिंदुत्वाच्या कार्यात येणार्या अडचणी स्पष्टपणे मांडण्याची वेळ आली आहे !’
३. रावतपुरा सरकार महाराज, चंबल, मध्यप्रदेश

‘हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला अवश्य भेट देऊ !’
४. पीठाधीश्वर श्रीमद्जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार, श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, अंबिकापूर-कोडण्यपूर (महाराष्ट्र) यांनीही हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले.

५. कराड, सातारा येथून आलेल्या श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री. सचिन पाटील आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांची भेट घेण्यात आली.
