Sri Sri Ravi Shankar At Mahakumbh : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री श्री रवीशंकर यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान !

डावीकडून सुनील घनवट, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, गुरुदेव श्री श्री रवीशंकर, चेतन राजहंस

प्रयागराज, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांची महाकुंभक्षेत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, पूर्व उत्तरप्रदेश अन् बिहार राज्याचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी समितीच्या वतीने पुष्पहार घालून आणि शाल देऊन या वेळी गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांचा सन्मान करण्यात आला.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांना माहिती दिली. गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगल्याप्रकारे चालू आहे. समितीच्या कार्याविषयी मला माहिती आहे’, असे सांगून कार्याला आशीर्वाद दिला. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही या वेळी उपस्थित होते. गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी या सर्वांचा सन्मान वस्त्र देऊन सत्कार केला.